मोठा अनर्थ टळला, एअर इंडियाच्या विमानाची बर्मिंगहॅमला तत्काळ लॅण्डिंग

एअर इंडियाच्या अमृतसरहून बर्मिंगहॅम जाणाऱ्या फ्लाइट एआय117 मध्ये शनिवारी इमरजेन्सी सिस्टम अॅक्टिव्ह झाली. त्यानंतर आपत्कालीन स्थितीत हे विमान बर्मिंघम येथे उतरविण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सुरक्षित असून विमानाने बर्मिंघम एअरपोर्टवर सुरक्षित लॅण्डिंग केले.

एअरइंडियाच्या निवेदनात म्हटले आहे की, 4 ऑक्टोबर 2025 ला अमृतसरहून बर्मिंघमला ही फ्लाइट जात होती. दरम्यान लॅण्डिंग काही वेळातच होण्यापूर्वी ऑपरेटिंग क्रूला विमानाचे रॅम एअर टर्बाइन डिप्लॉयमेण्टची माहिती मिळाली. तपासात सर्व इलेक्ट्रिकल आणि हायड्रॉलिक पॅरामीटर बरोबर असल्याचे दिसले . त्यामुळे कुठलाही तांत्रिक बिघाड नोंदवला नाही.

कंपनी पुढे म्हणाली की, मानक प्रक्रिया लक्षात घेता विमानाच्या तपासणीसाठी विमानाची सेवा तात्पुरता बंद करण्यात आली आहे. या विमानाचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. एअर इंडियाकडून ज्या प्रवाशांचे परतीचे उड्डाण रद्द झाले त्यांच्यासाठी पर्यायी अथवा राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर मधील डेटाची देखील तपासणी सुरु आहे असे एअरइंडियाकडून सांगण्यात आले.रॅट म्हणजेच रॅम एअर टर्बिन ही आपत्कालीन सुरक्षा प्रणाली आहे.