बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी सचिन अहिर; नितीन नांदगावकर सरचिटणीस, तर गौरीशंकर खोत मार्गदर्शक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या. बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपनेते नितीन नांदगावकर यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर उपनेते गौरीशंकर खोत यांना प्रमुख मार्गदर्शक बनवण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.