जुन्या वादातून मित्राची हत्या; पाच जणांना अटक

जुन्या वादाच्या रागातून तीन भावांनी मित्राची हत्या केल्याची घटना शांती नगर परिसरात घडली. जिशान अन्सारी (25) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शांती नगर पोलिसांनी तीन भावांसह दोन महिला अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

शांती नगर परिसरात राहणारे हसन शेख (22), मकबूल शेख (30), हुसेन शेख (28) हे तिघे भाऊ एका गोदामात हमालीचे काम करतात. याच गोदामात काम करणारा जिशान याच्यासोबत किरकोळ कारणावरून त्यांचा वाद झाला. याच भांडणाचा राग मनात धरून या तिघा भावांनी जिशानच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मदत केली. या वेळी तिघांसोबत सुलताना शेख आणि आसाम वाजिद यांनी जिशानच्या घरच्यांना मारहाणदेखील केली.

या पाच जणांनी जिशानला केलेल्या मारहाणीत त्याचा मत्य याला या प्रकरणी शांती नगर पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीवरून मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या पाचही जणांविरोधात गुन्हा दाखाल करत अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनी दिली.