
फ्रान्सहून ब्रिटनला 85 तरुणांना घेऊन जाणाऱ्या बोटीत स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. बोटीत पाच हिंदुस्थानी तरुण होते. यापैकी एक तरुण बेपत्ता असून चौघांना वाचवण्यात यश आले आहे. अरविंदर सिंग असे बेपत्ता तरुणाचे नाव असून तो पंजाबच्या जालंधरमधील आदमपूर गावातील रहिवासी आहे.
सदर बोट डंकी मार्गाने फ्रान्सहून ब्रिटनला चालली होती. यादरम्यान अचानक हवा गळती आणि स्फोटामुळे बोट पाण्यात पडली. अपघाताची माहिती मिळताच फ्रेंच पोलिसांनी बचाव कार्य राबवत तरुणांना वाचवले. यात पाच पंजाबी पाच तरुणांपैकी चार जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले, परंतु अरविंदर सिंग अजूनही बेपत्ता आहे. कुटुंबाने पंजाब आणि केंद्र सरकारला अरविंदरचा शोध घेण्यासाठी मदत करण्याचे आणि फ्रेंच पोलिसांशी सतत संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे.