पालिकेने 7 हजार 789 बॅनर, फलक हटवले

मुंबई महापालिका क्षेत्रात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेले तब्बल 7 हजार 789 बेकायदेशीर आणि परवानगीची मुदत संपलेले होर्डिंग, फलक, तात्पुरते प्रवेशद्वार, भित्तीपत्रके पालिकेने हटवले आहेत. पालिकेचे अनुज्ञापन खात्याने दोन दिवसांत ही कारवाई केली आहे. हटवलेल्या साहित्यामध्ये 5 हजार 522 बॅनर, हजार 266 फलक (बोर्ड), 508 पोस्टर्स तसेच 493 झेंडे यांचा यामध्ये समावेश आहे. पालिकेकडून ही कारवाई सुरूच राहणार आहे.