
भाजपचे माजी नगरसेवक संजय थेराडे यांचे आणि त्यांच्या पत्नीचे ओवळा-माजिवडा आणि मीरा-भाईंदर या दोन विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून नाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ता दीपक बागरी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मीरा रोड येथील अस्मिता क्लब येथे काँग्रेसने भाजपने केलेल्या वोट चोरीसंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी दीपक बागरी यांनी सांगितले की, ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात संजय थेराडे यांचे यादी क्र. १२६ अनुक्रमांक ९४३ तर त्यांच्या पत्नी वनिता यांचे नाव त्याच यादीमध्ये अनुक्रमांक ९४४ वर आहे. असे असताना १४५ मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातही यादी क्र. २९२ मध्ये १०२८ तर पत्नीचे १०२९ वर नोंदवण्यात आले आहे. मतदार यादीत भाजपने केलेल्या घुसखोरीची सखोल चौकशी करण्याची मागणीही बागरी यांनी केली आहे.
इमारत तीन मजल्याची मग फ्लॅट चौथ्या मजल्यावर कसा?
धक्कादायक बाब म्हणजे थेराडे राहत असलेली निवासी इमारत तीन मजल्यांची असताना त्यांचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर दाखवला आहे. मतदार यादीत ४०३ व ४०८ फ्लॅटचा पत्ता दाखवला आहे. या सर्व बोगस प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.