
युवासेनेच्या वतीने दिवा शहरात आयोजित करण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धेत सिद्धिविनायक मित्र मंडळाने प्रथम तर अचानक मित्र मंडळाने द्वितीय क्रमांक मिळवला. शहर युवाधिकारी अभिषेक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत दिवा शहरातील ३७सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुमित हॉल येथे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
स्पर्धेमध्ये सिद्धिविनायक मित्र मंडळ हे प्रथम क्रमांक पटकावत विजयी झाले असून त्यांना सन्मानचिन्ह, दहा हजार रुपये तसेच प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांक अचानक मित्र मंडळास सात हजार, सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्र व तृतीय क्रमांक मिळविलेल्या श्री एकरूप मित्र मंडळास पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभ सुमित हॉलमध्ये पार पडला. यावेळी उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील, उपजिल्हा संघटक अंकिता पाटील, सुमित भोईर, विधानसभा संपर्कप्रमुख रोहिदास मुंडे, शहरप्रमुख सचिन पाटील, महिला विधानसभा संघटक योगिता नाईक, महिला शहर संघटक ज्योती पाटील, महिला शहर समन्वयक प्रियांका सावंत, उपशहरप्रमुख मारुती पडळकर, युवासेना शहर सचिव उमेश राठोड, विभागप्रमुख चेतन पाटील, संजय जाधव, योगेश निकम, रवी रसाळ, विभाग संघटक प्रिया भोईर, अजित माने, अमोल पाटील, अशोक अमोंडकर, संजय अर्दाळकर, नितीन सावंत, प्रवीण उतेकर यांच्यासह शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.