उत्तराखंडच्या केदारनाथ, बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी

उत्तराखंडमधील दोन प्रमुख धाम बद्रीनाथ आणि केदारनाथसह उंच पर्वत परिसरात बर्फवृष्टी झाली. हेमकुंड साहिबसह नीती आणि माणा खोऱ्यात बर्फवृष्टी झाली. चमोली परिसरात चारही बाजूंनी बर्फाची चादर पसरल्याचे चित्र दिसत होते. गंगोत्री धामच्या डोंगराळ भागातसुद्धा मोठी बर्फवृष्टी होत आहे.