
1 जुन्या काळात बांधलेल्या इमारतीत अजूनही काही लोक राहतात. अशा इमारतीत राहणे हे धोकादायक असते. त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
2 जर तुमची इमारत मोडकळीस आली आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर शक्य तितक्या लवकर महापालिका किंवा संबंधित विभागाकडे याची तक्रार करा.
3 तक्रारीनंतर प्रशासनाकडून इमारतीचे सर्वेक्षण केले जाईल. जास्त मोडकळीस आली असल्यास ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केले जाईल.
4 इमारत धोकादायक ठरवल्यास रहिवाशांनी ही इमारत तत्काळ रिकामी करणे गरजेचे आहे. रिकामी केल्यानंतर या इमारतीचा पुनर्विकास किंवा दुरुस्ती करता येईल.
5 शासनाने योग्य वेळी सर्वेक्षण करून इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे, तर रहिवाशांनीही सहकार्य करणे महत्त्वाचे आहे.