फक्त दोन मिनिटे असा मसाज करुन बघा, चेहऱ्यावर येईल अनोखा ग्लो

सध्याच्या घडीला आईस क्यूब्स किंवा आईस डिप्सने फेस मसाज करणे हा ट्रेंड आहे. या मसाज पद्धतीमुळे आपल्या चेहऱ्यावरील छिद्रांना घट्ट करण्यास आणि रक्ताभिसरण वाढविण्यास, घट्टपणा आणि तरुणपणा टिकवून ठेवण्यास मदत करते. आईस क्यूब मसाज त्वचेला ताजेतवाने ठेवते. तसेच यामुळे त्वचेवरील सूजही कमी होते. तसेच हे आईस क्यूब आपल्या डोळ्यांच्या खालील त्वचेवरही प्रभावी मानले जातात. यामुळे आपल्या डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात. आइस क्यूब तयार करताना काही महत्त्वाच्या टिप्स वापरल्या तर अधिक उत्तम परीणाम दिसतील.

घरी केलेली खीर पाण्यासारखी पातळ होतेय? मग या टिप्स वापरा

कोरफड क्यूब्ज
साध्या पाण्याऐवजी कोरफड जेलचे तुकडे सुद्धा आपण तयार करू शकतो. कोरफड जेलचे बर्फ बनवण्यासाठी ठेवताना, त्यात काही थेंब लिंबाचा रस घालता येईल. या बर्फाच्या क्यूबने चेहऱ्यावर मालिश केल्याने, त्वचा हायड्रेट होण्यास मदत मिळते. तसेच आपल्या त्वचेवरील डागही कमी होतात. त्वचेवरील पुरळ आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास देखील हे आइस क्यूब खूप उपयुक्त आहेत.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी या सवयी आजपासून लावून घ्या, वाचा

आवळ्याच्या रसाच्या क्यूब्ज
व्हिटॅमिन सी ने समृद्ध, आवळा त्वचा आणि केस दोघांसाठीही वरदान मानला जातो. म्हणून आवळा खाण्यासोबत त्वचेवर लावल्याने देखील फायदा होतो. आवळ्याच्या रसापासून केलेले बर्फाचे क्यूब्ज त्वचा केवळ उजळवणार नाहीत. तर त्वचेला अनोखा ग्लो देतील.

घरी केलेली खीर पाण्यासारखी पातळ होतेय? मग या टिप्स वापरा

ग्रीन टी आणि तांदळाचे पाणी क्यूब्ज
त्वचेच्या काळजीमध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर खूप लोकप्रिय आहे आणि अनेक उत्पादनांमध्ये वापरला जातो. ग्रीन टी त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. चेहऱ्याच्या मालिशसाठी हे दोन घटक मिसळून बर्फाचे क्यूब्ज बनवू शकता. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते. तसेच तेलकट त्वचा आणि केसांसाठी अधिक फायदेशीर बनते.

फक्त पनीरच नाही तर, प्रथिनांनी समृद्ध हे पदार्थ आहेत आरोग्यासाठी उत्तम, वाचा

कडुलिंबाचे बर्फाचे क्यूब्ज
अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध, कडुलिंब त्वचेवरील फोड, मुरुमे आणि संक्रमण कमी करण्यास प्रभावी आहे. म्हणून कडुलिंबाची पाने उकळून, गाळून चेहऱ्याच्या मालिशसाठी बर्फाचे क्यूब्ज बनवणे फायदेशीर आहे. यामध्ये टी ट्री आॅईलचाही वापर करु शकता. कडुलिंबाची पाने आणि सालीपासून बनवलेला फेस पॅक देखील त्वचेसाठी फायदेशीर आहे.

बीटरूट आणि गुलाब पाणी
फक्त पाण्याऐवजी, बीटरूटचा रस आणि गुलाब पाण्याचे बर्फाचे क्यूब्ज त्वचेला गुलाबी चमक देतीलच असे नाही तर ती ताजी ठेवतील. पिगमेंटेशन आणि बारीक सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत होते. मुख्य म्हणजे गुलाब पाणी एक उत्कृष्ट नैसर्गिक टोनर आहे. तर बीटरूटमध्ये भरपूर पोषक घटक असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.