
सोलापूर जिल्ह्यात सीना नदीकाठ व भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना वारंवार पुराचा फटका बसला आहे. या संकटातून शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे झाले आहे.सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत केली पाहिजे. राज्य सरकारने निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळत कर्जमाफी करावी तसेच मागील तीन महिन्यात झालेल्या सतत अतिवृष्टीमुळे भाळवणी तसेच भंडीशेगाव सर्कल तसेच तालुक्यातील इतरही गावे नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित आहेत. तेथे त्वरित पंचनामे करावेत या मागणीसाठी बुधवार ८ ऑक्टोबर रोजी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी तहसील कार्यालय पंढरपूर येथे निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले,सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे तसेच वारंवार आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे,सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळं होत्याचे नव्हते झाले आहे. पंढरपूर तालुक्यातही अतिवृष्टीमुळे द्राक्ष,डाळींब,केळी बागा तसेच इतरही अनेक भुसार पिके उध्वस्त झाले आहेत. मात्र २४ तासात ६५ मिलीमीटर पावसाच्या निकषामुळे भरपाई मिळण्यापासून शेतकरी वंचित राहण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. शासनाने जाहीर केलेली भरपाई अतिशय कमी असून पंजाब सरकार प्रमाणे हेक्टरी ५० हजार रुपये मदतीसह संपूर्ण कर्जमाफी शासनाने केली पाहिजे. तसेच शासनाने शेतकऱ्यांना मदत देण्याच्या नावाखाली उसातून प्रतिटन १५ रुपये वसूल करण्याचा जुलमी निर्णय शासनाने घेतला आहे. तो त्वरित रद्द करावा अशी मागणी यावेळी केली. यावेळी बोलताना युवासेनेचे सहसचिव स्वप्नील वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत कर्जमाफी आता नाही तर केव्हा करणार असा सवाल उपस्थित केला.
यावेळी जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे,युवा सेना सहसचिव स्वप्निल वाघमारे,उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत घाडगे, काकासाहेब बुराडे.जयवंत माने.तालुकाप्रमुख बंडू घोडके,शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर.विधानसभा प्रमुख रणजित कदम, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शिवाजी जाधव,उपतालुकाप्रमुख नागेश रितूड, उत्तम कराळे,संजय घोडके,अनिल जाधव,अर्जुन भोसले, प्रशांत जाधव,विजय नलावडे,दादा कुंभार,अंकुश साळुंखे,सोमनाथ अनपट, बापू कोळी,एकनाथ कोरके,गणेश गुरव,अक्षय कचरे,किरण कोरके,योगेश कारंडे, दादा पाटील महम्मद पठाण भास्कर घाडगे मोहन धुमाळ कल्याण कदम नामदेव चव्हाण,सुहास चव्हाण,महादेव चव्हाण,डॉक्टर अनिल क्षीरसागर तानाजी कदम,लंकेश बुराडे,उपशहर प्रमुख नितीन थिटे,प्रणीत पवार,किरण सुरवसे, महादेव चव्हाण,कृष्णदेव लवटे,विनायक ढोबळे,दत्ता भोसले,गणेश जरंगे,नवनाथ शिखरे,बंडू सुरवसे,भारत पोरे,महिला आघाडीच्या कुंदाताई माने,संगीता ताई पवार,मंजुळाताई दोडमिसे, अनिताताई आसबे,सरस्वती गोसावी,रेहाना आतार,विमल टिंगरे,सुरेखा वाघ,राम सरिक,अर्जुन वाघ,बळीराम देवकते,महावीर हाके,बापू सावंत,शंकर सावंत,अमोल भैया पवार,दत्तात्रय पाटील, सुभाष अहिरे,माऊली गोरे, नानासाहेब सलगर, चंद्रकांत पाटोळे ,नवनाथ रितुंड, संतोष रोकडे, बाळासाहेब पवार, दादा शेटे, उमेश साळुंखे ,समीर साळवी, अरुण कांबळे, बाबासाहेब अभंगराव, अण्णा पाटील, अजित शेवतकर, कांतीलाल माळी, ज्ञानू माळी, ज्येष्ठ शिवसैनिक जालिंदर शिंदे, प्रवीण शिंदे, सचिन वाघ, समाधान सरीक, संतोष वाघ, भिकाजी वाघ, शिवाजी घोडके, नवनाथ चव्हाण, दत्तात्रेय जाधव, तानाजी रणदिवे , रुबी चंदनशिवे आदी शिवसैनिक व महिला पदाधिकारी उपस्थित होते