
स्वदेशी सामानाची खरेदी करा, देशाचा पैसा देशातच राहील, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भुयारी मेट्रोच्या वरळी सायन्स म्युझिअम ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. याचवेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.
स्वदेशीचा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, “मी तुम्हाला स्वदेशी स्वीकारण्याचा आग्रह करतो. गर्व से कहो हम स्वदेसी है.” ते म्हणाले, “हा प्रत्येक घराचा आणि प्रत्येक बाजारपेठेचा मंत्र असला पाहिजे. प्रत्येक नागरिक स्वदेशी वस्तू खरेदी करून घरी आणेल आणि स्वदेशी वस्तू भेट देईल. यामुळे देशाचा पैसा देशात राहील. यामुळे हिंदुस्थानी कामगारांना काम मिळेल आणि तरुणांना रोजगार मिळेल. जेव्हा संपूर्ण देश स्वदेशी उत्पादने स्वीकारेल तेव्हा हिंदुस्थानची क्षमता किती वाढेल याची कल्पना करा.”