प्रबोधनकारांच्या पुस्तकाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा, शिवसेनेचे कस्तुरबा रुग्णालयावर जोरदार आंदोलन

पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात एका कर्मचाऱ्याच्या निवृत्ती कार्यक्रमात संबंधिताने प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची पुस्तके वितरीत केल्यानंतर पुस्तकांबाबत काही कर्मचाऱ्यांकडून आक्षेपार्ह वर्तन करण्यात आले. या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करीत शिवसेनेने रुग्णालयावर धडक देत आंदोलन केले. यावेळी रुग्णालयाच्या अधिष्ठातांसह आग्रीपाडा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन पुस्तकांबाबत आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

कस्तुरबा रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर शिवसेनेने संताप व्यक्त करीत आंदोलन केले. शिवसेना उपनेते मनोज जामसुदकर, उपनेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विभाग क्र. 11 व भायखळा विधानसभा क्षेत्राच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी रुग्णालयावर धडक दिली. यावेळी कस्तुरबाच्या अधिष्ठातांची भेट घेऊन उपद्रवी कर्मचाऱयांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदनही देण्यात आले. तसेच आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे बबन गावकर, विजय कामतेकर, सुरेखा राऊत, चंदना साळुंखे, हेमंत कदम, सूर्यकांत पाटील, कीर्ती शिंदे, शाखाप्रमुख रमेश रावल, काका चव्हाण, गोपाळ खाडये, सुहास भोसले, ंिलगप्पा चलवादी, प्रकाश बागवे, सलीम शेख. म. शाखा संघटक प्रियांका टेमकर, शिल्पा म्हात्रे, अंजना औटी, विद्या राबडिया, युवासेनेचे ओमकार पाटील, सिद्धेश मंडलिक, चेतन थोरात, अमित जाधव, राजन कोळंबेकर, सचिन पाटील, रमेश देशमुख यांच्यासह शेकडो शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.