
दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात डॉक्टरांनी एका 19 वर्षाच्या मुलीला नवे जीवदान दिले आहे. मुलीच्या पोटातून 10 किलोचा ट्युमर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करुन बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पोटात तीस, वीस आणि वीस सेमी माप आणि 10.1 किलोग्रॅम वजनाच्या दुर्लभ रेट्रोपेरिटोनियल ट्युमर वाढत होता. ही शस्त्रक्रिया डॉक्टरांसाठी आव्हान होते. मात्र डॉक्टरांनी ते आव्हान पेलून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. डॉक्टरांनी सांगितले की, एचडीयून वार्ड 24 मध्ये तिची नीट काळजी घेतल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सीटीव्हीएस तज्ज्ञ, ओटी आणि आयसीयू कर्मचारी आणि सहाय्यक सहभागी होते. सर्व तत्ज्ञांचे लक्ष्य रुग्णाचे अवयव सामान्य स्थितीत आणणे याकडे होते.
संचालक डॉ. संदीप बंसल, प्राचार्य डॉ. गीतिका खन्ना, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चारू बंबा आणि भूल विभागाचे प्रमुख डॉ. कविता शर्मा यांच्या नेतृत्वाखाली, सर्जरी युनिट S6 च्या प्राध्यापक डॉ. शिवानी बी. पारुथी यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ सर्जिकल टीमने ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वी केली.