
या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लास्झलो क्रास्नाहोरकाई यांना जाहीर झाला. स्वीडिश अकादमीने गुरुवारी या पुरस्काराची घोषणा केली.
स्वीडिश अकादमीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘लास्झलो यांच्या रचना खूप प्रभावशाली, गहन आणि दूरदर्शी आहेत. जगात भय आणि अस्थिरतेच्या वातावरणात ते कलेची ताकद दाखवून देतात.’
लास्झलो क्रास्नाहोरकाई 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजे 10.3 कोटी रुपये, सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र मिळेल. हे पुरस्कार 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोममध्ये प्रदान केले जातील. लास्झलो क्रास्नाहोरकाई हे हंगेरीच्या सर्वात प्रतिष्ठत समकालीन लेखकांपैकी एक आहेत. त्यांची पुस्तके बहुतेकदा तात्विक असतात, मानवता, अराजकता आणि आधुनिक समाजातील संकटांचा शोध घेतात.