
सप्टेंबर महिना ऑटोमोबाइल इंडस्ट्रीसाठी जबरदस्त राहिला आहे. जीएसटीमध्ये सुधारणा झाल्यानंतर मर्सिडीज बेंज इंडियाने सप्टेंबर महिन्यात चांगली विक्री केली. केवळ नवरात्रीत 2500 गाड्यांची विक्री केली, तर सप्टेंबर 2025 मध्ये दुसऱ्या तिमाहीत एकूण 5119 गाड्यांची विक्री केली. सप्टेंबर महिन्यात जीएलएस, एमजी जी63 एसयूव्हीएस आणि ईक्यूएस एसयूव्ही यांसारख्या गाड्यांनी रेकॉर्ड बनवला आहे. जीएलएल, एस-क्लास, मर्सिडीज-मेबॅक, एमजी जी63 यांसारख्या गाड्यांना पसंती मिळत आहे.