वीज बचत करायची असेल तर… हे करून पहा

वीज बचत करणे ही चांगली सवय आहे. अनावश्यक वीज वाया जात असेल तर वीज बिल जास्त येते. तसेच विजेचे नुकसानही होते. त्यामुळे सर्वांनी वीज बचत करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वात आधी घरातून बाहेर पडताना किंवा गरज नसताना लाईट, पंखे आणि इतर उपकरणे बंद करा. नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करा आणि दिवसा फिकट रंगाचे पडदे वापरा.

nआवश्यक असेल तेव्हाच एसीचा वापर करा. जुन्या बल्बऐवजी एलईडी बल्बचा वापर करा. सामान्य पंख्यांपेक्षा बीएलडीसी मोटर्स असलेले पंखे वापरा. त्यामुळे विजेची बचत होऊ शकते. वीज वाचवण्यासाठी एनर्जी स्टार रेटिंग असलेल्या वस्तू घरात वापरा. गरज नसेल तेव्हा उपकरणांचा पॉवर स्विच बंद करा. शक्य असेल तर सौर ऊर्जेचा वापर करा. थोडी थोडी केलेली वीज बचत ही मोठी वीज बचत होऊ शकते.