अनिलकुमारांविरोधात ईसीआयआर कोणत्या आधारावर नोंदवला? हायकोर्टाचा ईडीला सवाल

बेकायदा बांधकामप्रकरणी वसई- विरार पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक करणाऱ्या ईडीला मुंबई उच्च न्यायालयाने आज फैलावर घेतले. अर्जदाराविरोधात ईसीआयआर कोणत्या आधारावर नोंदवला? याबाबत नेमकी माहिती कुठून मिळाली इतकेच काय तर एफआयआरमधील मूळ आरोपींची चौकशी न करता कोणालाही अटक करण्याचे अधिकार ईडीला आहेत का? अशी प्रश्नांची सरबत्ती करत मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने अंमलबजावणी संचालनालयाला जाब विचारला.