Photo – दिवाळी खरेदीसाठी मुंबईच्या बाजारपेठा सज्ज!

दिवाळी सण जेमतेम आठवडाभरावर आला असून या सणाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत.  रांगोळ्या, लायटिंगचे तोरण, पारंपरिक आकाशकंदील, खमंग फराळ, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी दादर, लालबाग, बोरिवली, घाटकोपरसह शहरातील विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मुंबईकरांची झुंबड उडाली आहे.

सर्व फोटो – रुपेश जाधव