
1 टॉप अप लोन म्हणजे तुमच्या विद्यमान कर्जावर (गृह कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज) घेतलेले अतिरिक्त कर्ज. टॉप-अप लोन घेण्यासाठी तुम्ही सध्याच्या कर्जाची परतफेड नियमितपणे केलेली असावी .
2 तुमच्या बँकेशी किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेशी संपर्क साधा, जिथे तुमच्याकडे आधीपासून कर्ज आहे तिथे तुम्हाला ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष अर्ज करता येईल.
3 टॉप अप कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा. उदाहरण द्यायचे तर 750 किंवा त्याहून अधिक असावा. तुम्ही ईएमआय वेळेवर भरत असाल याची खात्री करा.
4 टॉप अप कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि उत्पन्नाची माहिती बँकेला द्यावी लागेल. बँकेकडून तुमच्या अर्जाची प्रक्रिया केली जाईल आणि तुमची पात्रता तपासली जाईल.
5 तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर पोर्टलद्वारे किंवा कर्जाच्या ऑप्लिकेशन फॉर्मद्वारे अर्ज करू शकता. अर्ज मंजूर झाल्यानंतर अतिरिक्त रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.