
काळ बदलला तसं अनेक गोष्टींचं स्वरूपही बदललं. लग्नसोहळेही यास अपवाद नाहीत. पूर्वी लग्न हा इव्हेंट मुख्य असायचा. त्यानंतर फार तर वरात असायची. आता मात्र लग्नसोहळा फिका पडेल इतके सोहळे लग्नाच्या आधी आणि नंतर होतात. प्री-वेडिंग शूट, पोस्ट वेडिंग शूट, मेहंदी, संगीत, रिसेप्शन, वरात… एक ना अनेक. केळवण हाही एक प्रचलित प्रकार. पूर्वी खूपच साध्या पद्धतीनं होणारं हे केळवण आता जंगी होऊ लागलं आहे. अलीकडंच एका मामानं आपल्या लाडक्या भाचीचं केलेलं केळवण चर्चेचा विषय ठरलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. केळवणाचा हा थाट लग्नालाही लाजवेल असा आहे. https://tinyurl.com/mr3uhzfa या लिंकवर तो व्हिडीओ पाहता येईल.