
तालिबानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी नुकतेच हिंदुस्थान दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. मुत्ताकी यांचे ज्या प्रकार स्वागत झाले, त्यावरून अनेक जण संताप व्यक्त करत आहेत. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील मोदी सरकारला फटकारले. जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानच्या प्रतिनिधीचे आपल्या देशात झालेले आदरातिथ्य पाहून माझी मान शरमेने खाली गेली. जे लोक प्रत्येक प्रकारच्या दहशतवादविरोधात उभे राहतात, तेच आज या दहशतवादी संघटनेच्या प्रतिनिधीचा सन्मान करत असल्याचे दिसत आहे. हे अतिशय दुःखद आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला. मुत्ताकी हे हिंदुस्थान दौऱ्यावर असताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील दारुल उलूम देवबंद या संस्थेलादेखील भेट दिली होती. त्यावरूनही जावेद अख्तर यांनी या संस्थेला खडे बोल सुनावले आहेत.