
पश्चिम-मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागरातदेखील दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता आहे. दरम्यान, मोसमी पाऊस पुढील काही दिवसांत माघार घेईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.