
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. वीरेंद्र तावडेसह शरद कळसकर व अमोल काळेला उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तावडेला 9 वर्षांनंतर जामीन मिळाला. या हत्येतील सर्व आरोपी आता जामिनावर सुटले आहेत.
कोल्हापूर सर्किट बेंचचे न्या. शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठाने हा जामीन मंजूर केला. कळसकर मात्र तुरुंगातच राहणार आहे. त्याला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी शिक्षा झाली आहे. त्याचे अपील प्रलंबित आहे. पानसरे कुटुंबीयांनी जामीन मंजूर करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती केली. ती न्यायालयाने मान्य केली नाही. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉम्रेड पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.