
आपल्याकडे फळांचं आणि भाज्यांचं योग्य प्रकारे सेवन करणे हे फार गरजेचे आहे. निरोगी आरोग्यासाठी फळांचे आणि भाज्यांचे सेवन करणे हे हितावह मानले जाते. फळांमध्ये फोलेट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. फोलेट स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करते आणि ही फळे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
दररोज फळे खाल्ल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायटोकेमिकल्स मिळतात. हे आपल्या हृदयासाठी चांगले असतात. हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी कोणती फळे खायला हवीत हे जाणून घ्यायला हवे.
सफरचंद – सफरचंदांमध्ये फायबर व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉल असतात. हे सर्व घटक कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. दररोज सफरचंद खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. म्हणूनच आपल्याला फार पूर्वीपासून डॉक्टर सफरचंद खाण्याची शिफारस करतात.
बदलत्या वातावरणाला सामोरे जाताना आहारात हे पदार्थ समाविष्ट करायलाच हवेत
द्राक्षे – गोड आणि आंबट द्राक्षांमध्ये रेसवेराट्रोल आणि अँथोसायनिन्स सारखे फायटोकेमिकल्स असतात. हे केमिकल्स कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करून जळजळ कमी करतात. आपल्या दैनंदिन आहारात द्राक्षे समाविष्ट केल्याने सिस्टोलिक रक्तदाब देखील कमी होऊ शकतो. रक्तदाब नियंत्रित केल्याने हृदयरोग टाळण्यास मदत होते.
अॅव्होकॅडो – अॅव्होकॅडोमध्ये निरोगी चरबी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. जे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवतात. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. दररोज अॅव्होकॅडो खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. हृदयासोबतच अॅव्होकॅडो देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात आणि वजन कमी करताना आहारात समावेश करतात.
ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी – ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी ही अँटिऑक्सिडंटने समृद्ध फळे आहेत. यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. फळांचे सेवन केल्याने टाइप २ मधुमेह आणि हृदयरोगांचा धोका कमी होण्यास मदत होते. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीचा समावेश करणे फायदेशीर आहे.