
राजस्थानमधील जैसलमेर-जोधपूर महामार्गावर मंगळवारी एसी स्लिपर बसला लागलेल्या आगीत तब्बल 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना आता बालोतरामध्ये तशीच दुर्घटना घडली आहे. ट्रेलरला कारची धडक लागून लागलेल्या आगीत चार मित्रांचा होरपळून मृत्यू झाला.
ही दुर्देवी घटना मेगा हायवेजवळील सादा गावात रात्री 1.30च्या सुमारास घडली आहे. कार चालकही यात गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डाबर गुडामालानी येथील पाच तरुण सिणधरी येथे कामाला गेले होते. रात्री 12 नंतर समोरुन येणारी ट्रेलर कारवर धडकली आणि आग लागली. आगीत नीरज शर्मा याने मोहन सिंह (35), शंभु सिंह (20), पंचाराम (22) आणि प्रकाश (28)यांचा होरपळून मृत्यू झाला.आगीत होरपळ्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक दिलीप सिंह गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर हायवेवर गर्दी जमा झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही तरुणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतदेहांची ओळख डीएनए टेस्टच्या माध्यमातून करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना कुटुंबियांकडे सोपविण्यात येईल. चारही मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.