
महाराष्ट्रात आणि मुंबईत शिवतीर्थावरील दीपोत्सवाचे आकर्षण आणि त्याची चर्चा असते. मन प्रसन्न करणारा दीपोत्सवाचा तो सोहळा असतो. यंदाचा हा उत्सव विषेश असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा दीपोत्सव आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार सजय राऊत यांनी सांगितले.
मुंबईत ठाकरे यांचाच उत्सव होणार, महाराष्ट्राचा, मुंबईचा आणि मराठी माणसाच्या एकजुटीचा हा दीपोत्सव आहे. मनसे आणि राज ठाकरे यांच्याकडून दरवर्षी शिवतीर्थावर दीपोत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव महाराष्ट्र आणि मुंबईच्या आकर्षणाचा विषय असतो. अत्यंत प्रसन्न करणारा तो सोहळा आहे. त्याचे उद्घाटन आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना या सोहळ्याचे निमंत्रण आहेत, ते येणार आहेत. तसेच या सोहळ्याला आपलीही उपस्थिती असेल, असे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे अनेक महिन्यांपासून एकत्र येत आहेत. चर्चा, संवाद होत आहेत. ते एकत्र काम करत आहेत, भूमिका मांडत आहेत. महाराष्ट्रात एकत्र राजकारण करत आहेत. त्यामुळे आता पुढील निर्णयाबाबत योग्यवेळी त्यांच्याकडून माहिती देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.