
महाराष्ट्राच्या अनेक जिह्यांत अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी पुरामुळे शेती उद्ध्वस्त झाली. ज्या जमिनीत पीक यायचं ती जमीनच खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. महायुती सरकार त्यांना मोकळ्या हाताने मदत करण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. नुकसानीचे स्वरूप पाहिले तर सरकारची मदत फार तोकडी आहे. या मदतीमुळे शेतकरी पुन्हा उभा राहील असे वाटत नाही, असे पवार म्हणाले.