Thane news – लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांना जामीन

ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांना अखेर जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात पाटोळे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली आहे. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला असून पाटोळे उद्या कारागृहाबाहेर येणार आहेत.

नौपाड्याच्या एका खासगी जागेतील अतिक्रमण हटविण्यासाठी बिल्डरकडून ५० लाखांच्या लाचेची मागणी करीत २५ लाखांची लाच कारल्याप्रकरणी मुंबई एसीबीने पाटोळे यांच्यासह ओमकार गायकर आणि सुशांत सुर्वे यांना अटक केली. यापूर्वी शंकर पाटोळे यांचा जामीन अर्ज ठाणे न्यायाल याने फेटाळला होता. दरम्यान, पाटोळे यांच्या वकिलांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

तक्रारदाराला धमकीचा फोन

पाटोळे लाच प्रकरणातील तक्रारदाराला एसीबी कार्यालयात जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एसीबी कार्यालयात तपासाच्या अनुषंगाने चर्चा सुरू होती. याचदरम्यान तक्रारदारांना फोन आला. या कॉलचे संभाषण मोबाईलमध्ये सेव्ह झाले आहे. तक्रारदारांनी तपास अधिकाऱ्यांना फोनमधील धमकीचे संभाषण ऐकण्यास दिले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.