
बनावट बिस्किटांच्या बदल्यात सोनाराकडून दागिने घेणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसंच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखा युनिट 3 ने या टोळीतील तीन सदस्यांना अटक केली आहे. ही टोळी सोनाराकडून खरे दागिने घेऊन त्या बदल्यात सोन्यासारखी दिसणारी पॉलिश केलेली पितळी बिस्किटे द्यायची. अखेर या टोळीला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे.
अंकित जैन, नरपत आणि प्रशांत अशी अटक आरोपींची नावे आहेत. नरेश केवलचंद जैन यांनी गुन्हे शाखेकडे दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी तक्रारदाराच्या कर्मचाऱ्याकडून 354.460 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेतले, ज्याची किंमत 40, 59, 843 रुपये इतकी आहे. या दागिन्यांच्या बदल्यात आरोपींनी सोन्यासारखी दिसणारी पितळी बिस्किटे देऊन फसवणूक केली.
हे प्रकरण गांभीर्याने घेत गुन्हे शाखा युनिट 3 ने समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत पोलिसांनी तीनआरोपींच्या मुसक्या आवळल्या.