
22 हजारांहून अधिक पर्यटकांनी दिवाळीची सुट्टी सत्कर्मी लावली. कच्च्या बच्च्यांसह पर्यटकांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त आनंद लुटला. दीपावलीच्या सुट्टीसाठी पर्यटकांनी उद्यानाला पसंती दिल्याने गेल्या चार दिवसांत तब्बल 24 लाखांचा महसूल जमा झाला.
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून दिवाळीच्या चार दिवसांत 22 हजारांहून अधिक पर्यटकांनी नॅशनल पार्कमध्ये हजेरी लावली. तरुण-तरुणींच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले होते. ट्रेकिंग, सायकलिंग करण्यावर पर्यटक विशेष पसंती देताना दिसले. नॅशनल पाका&चा गेट ते कान्हेरी गुंफापर्यंत जाणारे रस्ते चालत जाणाऱया पर्यटकांनी दुतर्फा भरलेले दिसले. गटागटाने पिकनिकला आलेल्यांची संख्यादेखील मोठी होती.
पर्यटकांनी दिवाळी सुट्टीचा उद्यानात मनसोक्त आनंद लुटला. आलेले सर्व पर्यटक आनंदी होऊनच घरी परतताना दिसले. ई-बग्गीतूनदेखील अनेकांनी प्रवाहांची मज्जा लुटली…
किरण पाटील, उपसंचालक (दक्षिण) बोरिवली






























































