असं झालं तर, व्हॉट्सअ‍ॅप इनऑक्टिव झाले तर…

देशभरातील स्मार्टफोनमध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे अ‍ॅप म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून चॅटिंगसोबत फोटो, मीडिया फाईल आणि पैसेही पाठवता येतात.

जर तुम्ही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप महिना दोन महिना ओपन केले नाही तर ते निक्रिय होण्याची भीती असते. त्यामुळे जर तुमचे व्हॉट्सऍप इनऑक्टिव झाले तर काय कराल.

30 दिवसांपेक्षा जास्त काळ निक्रिय राहिल्यास, खाते कायमचे हटवले जाते. ‘प्रोफाईल आपोआप काढून टाकले गेले’ असे दिसू शकते.

दीर्घकाळासाठी निक्रिय राहिल्यास, तुम्हाला ज्या ग्रुप्सचे सदस्य आहात त्यातून काढून टाकले जाऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप हे बराच काळ बंद ठेवले जाऊ शकत नाही.

अकाऊंट पुन्हा सक्रिय करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप अनइंस्टॉल केले असेल तर ते पुन्हा इन्स्टॉल करा. बॅकअप असल्यास तुम्ही बॅकअप वापरून चॅट आणि डेटा पुन्हा मिळवू शकता.