हे करून पहा… हॉटेलसारखी तडका डाळ घरी करा

हॉटेलसारखी तडका डाळ घरी बनवायची असेल तर काही सोप्या टिप्स आहेत. सर्वात आधी तूरडाळ चांगली धुवा. प्रेशर कुकरमध्ये डाळ, पाणी, हळद आणि मीठ घाला. चव वाढवण्यासाठी तूप आणि तेजपत्ता घाला. डाळ मऊ होईपर्यंत शिजवा. तडका बनवण्यासाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि टोमॅटो टाका.

एका छोटय़ा पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करा. त्यात जिरे आणि मोहरी टाका. जिरे तडतडल्यावर हिंग, लसूण आणि मिरची घाला. लसूण सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. आता चिरलेला टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा. तयार झालेला तडका शिजवलेल्या डाळीत घाला आणि नीट मिसळा. वरून चिरलेली कोथिंबीर घाला.