राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची घोषणा डॉ. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

विज्ञानाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिल्या जाणाऱया राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. एपूण 24 शास्त्रज्ञांना विज्ञान पुरस्कार जाहीर झाले असून त्यात मुंबईतील डॉ. अनिरुद्ध पंडित आणि पुण्याचे प्रा. सुहृद मोरे यांचा समावेश आहे.

पेंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱया या पुरस्कारांमध्ये ‘विज्ञान रत्न’ हा सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कार आहे. त्याशिवाय, ‘विज्ञान श्री’ आणि शांतीस्वरूप भटनागर विज्ञान युवा पुरस्कार दिले जातात. सामूहिक प्रयत्नांतून विशेष कामगिरी केलेल्या संशोधन गटाला विज्ञान टीम या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

जयंत नारळीकर यांनी खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रात दिलेल्या योगदानासाठी त्यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. खगोलशास्त्रासारखा किचकट विषयाची सर्वसामान्यांना गोडी लावणाऱया नारळीकर यांनी या क्षेत्रात अजोड काम केले होते. ‘आयुका’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशात खगोल शास्त्रज्ञांची पिढी घडवली. काही महिन्यांपूर्वीच डॉ. नारळीकर यांचे निधन झाले.

मुंबईतील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे (आयसीटी) पुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित यांची विज्ञान श्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुण्याच्या ‘आयुका’ संस्थेतील सहायक प्राध्यापक डॉ. सुहृद मोरे, बेंगळुरूच्या नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसमधील (एनसीबीएस) शास्त्रज्ञ डॉ. दीपा आगाशे यांची शांतीस्वरूप भटनागर विज्ञान युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

अरोमा मिशनला विज्ञान टीम सन्मान

सुगंधी तेल आणि सुगंधी उत्पादनांना चालना देण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे (सीएसआयआर) राबवण्यात येणाऱया अरोमा मिशनची विज्ञान टीम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.