
बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात इंडिया आघाडीप्रणित महागठबंधनने जोरदार मुसंडी मारली आहे. महागठबंधनने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. प्रत्येक कुटुंबातील एकास सरकारी नोकरी, महिलांना महिना 2,500 रुपये आणि 200 युनिटपर्यंत मोफत वीज अशी 25 आश्वासने महागठबंधनने मतदारांना दिली आहेत. ‘संपूर्ण बिहार का संपूर्ण परिवर्तन – तेजस्वी प्रतिज्ञा, तेजस्वी प्रण’ असे घोषवाक्य असलेले संकल्प पत्र 2025 इंडिया आघाडीने प्रसिद्ध केले.


























































