
नोव्हेंबर महिन्यात देशातील विविध राज्यांमध्ये बँका एपूण 11 दिवस बंद राहणार आहेत. महिन्यातील पाच रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारव्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी बँका चार दिवस बंद राहणार आहेत. 1 नोव्हेंबर कन्नड राज्योत्सवनिमित्त कर्नाटक आणि उत्तराखंड, 2 नोव्हेंबर रविवार, 5 नोव्हेंबर गुरू नानक जयंती, 6 नोव्हेंबर नोंगव्रेम मेघालाय, 7 नोव्हेंबर वांगाला महोत्सव मेघालय, 8 नोव्हेंबर दुसरा शनिवार, 9 नोव्हेंबर रविवार, 16 नोव्हेंबर रविवार, 22 नोव्हेंबर चौथा शनिवार, 23 नोव्हेंबर रविवार आणि 30 नोव्हेंबर रविवार असल्याने सर्वत्र बँका बंद राहतील. बँका बंद असल्याने ऑनलाइन बँकिंग, यूपीआय, एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार करणे किंवा इतर व्यवहार करणे सुरू ठेवू शकता. बँक सुट्टय़ांमुळे या सेवांवर परिणाम होणार नाही.






























































