21 नोव्हेंबरला येतेय द फॅमिली मॅन-3 वेब सीरिज

बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांची सुपरहिट ठरलेली वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन’चा तिसरा भाग येत्या 21 नोव्हेंबरला ओटीटीवर येत आहे. मनोज वाजपेयीला लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जाणारी श्रीकांत तिवारीची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. या सीरिजचा पहिला सीझन 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता, तर दुसरा सीझन 2021 मध्ये प्रदर्शित झाला आहे. या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या चार वर्षांपासून चाहत्यांना ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा होती आणि आता अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. या सीझनमध्ये जयदीप अहलावत आणि निम्रत कौर यांची एंट्री होत आहे.