किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयमुळे नोकऱ्यांमध्ये उलथापालथ झाली आहे. यामुळे अनेक कंपन्यांमध्ये नोकरदार कपात होऊ लागली आहे. तसेच एआयचा वापर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही तर, आता वैद्यकीय आणि नातेसंबंधांच्या सल्ल्यासाठी एआय वापरले जात आहे. अलिकडच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, एआयचे वैयक्तिक स्वरूप किशोरवयीन मुलांना आकर्षित करत असून तरुणाईमध्ये एआयची जादू दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

अमेरिकेत एका शाळेतील मुलांचा सर्व्हे करण्यात आला. त्यात एक तृतियांश मुलं एआयला आपला मित्र समजून गप्पा मारतात. हे चिंताजनक आहे. मेल अलाईज यूकेने थेरपी किंवा थेरपिस्ट म्हणून लेबल असलेल्या चॅटबॉट्सच्या वाढत्या ट्रेंडबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कॅरेक्टर एआय द्वारे उपलब्ध असलेल्या सर्वात लोकप्रिय चॅटबॉट्सपैकी एक आहे. त्याला एका वर्षात 7 कोटी 80 हजार संदेश मिळाले. ही संस्था एआय गर्लफ्रेंडच्या वाढत्या ट्रेंडबद्दल देखील चिंतित आहे. ज्यामध्ये युजर्स त्यांच्या ऑनलाइन जोडीदाराच्या दिसण्यापासून ते त्यांच्या वर्तनापर्यंत सर्वकाही वैयक्तिकरित्या निवडू शकतात. इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्सच्या 37 शाळांमध्ये केलेल्या सर्व्हेक्षणात 53 टक्के अल्पवयीन मुलांचे म्हणणे आहे की, त्यांना वास्तविक दुनियेपेक्षा ऑनलाईन जग जास्त आवडते.

हे संशोधन अशा वेळी आले आहे जेव्हा लोकप्रिय आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉट स्टार्टअप character.ai ने किशोरांना त्यांच्या AI चॅटबॉट्सशी खुले संभाषण करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. याचा वापर लाखो लोक वैद्यकीय आणि रोमँटिक माहितीसाठी करत होते.