पंतप्रधान मोदी भित्रे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं नाही हे सांगावं; राहुल गांधी यांचे आव्हान

भाजपने महाराष्ट्रात आणि हरयाणात मतचोरी केली असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. तसेच पंतप्रधान मोदी भित्रे आहेत, ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान थांबवलं नाही हे सांगावं असे जाहीर आव्हान राहुल गांधी यांनी दिले.

बिहारच्या सभेत राहुल गांधी म्हणाले की, भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मतचोरीचा मार्ग स्वीकारला कारण त्यांना तुमच्या आवाजाची भीती वाटते. 1971 मध्ये बांगलादेश युद्धाच्या वेळी अमेरिकेने भारताला धमकवण्यासाठी आपली विमानं आणि नौदल पाठवलं होतं, पण त्या वेळीच्या पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की त्यांना भीती नाही. इंदिरा गांधी महिला होत्या, तरी त्यांच्यात नरेंद्र मोदींपेक्षा जास्त धैर्य होतं. पंतप्रधान मोदी भित्रे आहेत. त्यांना कोणतीही दूरदृष्टी नाही आणि तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमोर उभा राहू शकत नाही. मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी जाहीरपणे सांगावं की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं नाही असेही राहुल गांधी म्हणाले.