
चष्म्याचा नंबर लागणे आता नवीन राहिले नाही. कमी वयाच्या मुलांनादेखील चष्म्याचा नंबर लागतो, परंतु हा चष्म्याचा नंबर एकसारखा राहत नाही, तो वाढत जातो.
जर तुमच्या चष्म्याचा नंबर वाढला असेल तर कोणती लक्षणे दिसू लागतात हे ओळखता आले पाहिजे. वस्तू अस्पष्ट किंवा धूसर दिसणे हे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे.
वारंवार डोकेदुखी होते. डोळ्यांवर ताण आल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. डोळे थकल्यासारखे वाटणे किंवा डोळ्यांतून पाणी येणे. रात्री लांबचे पाहताना त्रास होणे.
जर तुम्हाला अशी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर डोळ्यांच्या डॉक्टरांना भेट देणे महत्त्वाचे आहे. डॉक्टर तुम्हाला योग्य तपासणी करून अचूक नंबरचा चष्मा देतील.
चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी कोणताही घरगुती उपाय करू नका. डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्या. दृष्टीमधील बदल हे गंभीर आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते.
 
             
		





































 
     
    






















