एल्फिन्स्टन पूल बंदचा दादरकरांना फटका; दिवाळीत व्यापाऱ्यांचे 40 टक्के नुकसान

ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल बंद झाल्याचा मोठा परिणाम यंदाच्या दिवाळीत दादर मार्केटमध्ये दिसला. दरवर्षी कोटय़वधीची उलाढाल होणाऱ्या दादर मार्पेटला दिवाळीत वाहतूककाsंडीचा फटका बसला. दादरपासून माहीम, माटुंग्यापर्यंत होणाऱ्या वाहतूककाsंडीमुळे अनेक ग्राहकांनी दादरकडे पाठ फिरवून उपनगरांतच दिवाळीची खरेदी केली. त्यामुळे दादरच्या व्यापाऱ्यांचे 40 टक्के नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम ऐन सणासुदीच्या तोंडावर सुरू करण्यात आले. त्याचा परिणाम दादरच्या मार्पेटमध्ये अधिक जाणवला. एल्फिन्स्टन पुलावरून धावणाऱ्या गाडय़ांची सध्या दादर परिसरात गर्दी होत आहे. सकाळ-सायंकाळी ठिकठिकाणी मोठी वाहतूककाsंडी होत असल्याने स्थानिक रहिवाशांसह खरेदीसाठी बाहेरून येणारे लोकही त्रस्त झाले आहेत. दरवर्षी दिवाळीत दादर पश्चिम व पूर्वेकडील परिसर खरेदीसाठी गजबजलेला असतो. यंदा दिवाळीच्या दिवसांत दादरच्या वाहतूककाsंडीचा मनस्ताप टाळण्यासाठी अनेक नागरिकांनी उपनगरांतील मार्पेटमध्येच खरेदीचा बेत आखला. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत दादर येथील व्यापाऱ्यांना 40 टक्के नुकसान सहन करावे लागले.