गंगाराम गवाणकर यांची सोमवारी शोकसभा

मालवणी भाषेला सातासमुद्रापार नेणारे प्रतिभावंत नाटककार गंगाराम गवाणकर यांचे 27 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. नाटय़ क्षेत्राला त्यांचे फार मोठे योगदान लाभलेले आहे. गवाणकर यांची शोकसभा येत्या 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहातील जयवंत दळवी लघु नाटय़गृहात आयोजित करण्यात आली आहे. या वेळी गवाणकरांच्या आठवणी जागवून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल. गवाणकर यांच्या चाहत्यांना, नाटय़रसिकांनी आणि सर्व रंगकर्मींनी उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद बोरिवली शाखाचे अध्यक्ष प्रभाकर (गोटय़ा) सावंत, रंगकर्मी प्रदीप कबरे, गवाणकर यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.