‘टाईमपास’ फेम मलेरिया दादूस अर्थात जयेश चव्हाणचं स्वप्न साकार: नव्या घरात केला गृहप्रवेश

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता जयेश चंद्रकांत चव्हाण म्हणजेच ‘टाईमपास’ चित्रपटातील प्रेक्षकांच्या मनात घर करणारा मलेरिया दादूस याने नुकताच त्याच्या पनवेलमधील नवीन घराबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

जयेश याने आपल्या अधिकृत अकाऊंटवर घराच्या प्रवेशद्वारासमोर उभं राहून क्लिक केलेला फोटो शेअर करत, “ही वास्तू नाही, आमच्या स्वप्नांचा पहिला Take आहे.” असं भावनिक कॅप्शन लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.

दरम्यान, जयेश चंद्रकांत चव्हाण याने अल्पावधीतच मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनय कौशल्यामुळे स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या या नवीन घरामुळे त्यांच्या आयुष्यात एक स्वप्न पूर्ण झालं असून, चाहत्यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत