स्वागत दिवाळी अंकांचे

शब्दोत्सव

यंदा शब्दोत्सव दिवाळी अंक ‘काव्य’ या विषयावर आधारित आहे. अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या या दिवाळी अंकात मान्यवर लेखकांचे लेख वाचण्याची पर्वणी असते. याही वर्षी ती दिसून येते. यंदा अंकामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी ‘जगण्याला पुरून उरणारे काव्य’ याविषयी संवाद साधलेला आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांनी ‘काव्याची बदलती भाषा’ या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. आयुष्याची 60 वर्षे काव्य निर्मितीच्या प्रवासाला वाहिलेले ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी त्यांचा काव्य निर्मितीचा प्रवास मांडला आहे, तर डॉ. यशवंत मनोहर यांनी काव्य हे ‘साध्य की साधन’ यावर मार्मिक चिंतन केलेले आहे. यासोबत प्रयाग शुक्ल, डॉ. मुग्धा धनंजय, समीर गायकवाड, डॉ. निशा शेंडे, जितेंद्र घाटगे, प्रा. रेखा मैड, रंजना बाजी, संजय अकोलीकर अशा मान्यवर लेखकांचे काव्याचा इतिहास, शैली, प्रकार, समाजनिर्मितीमधील काव्याचा हातभार यावर आधारित अभ्यासपूर्ण लेखन आहे. प्रियांका पाटील यांची दीर्घ कथा, सुनील यावलीकर यांचा ललित लेख व इतर महत्त्वपूर्ण लेख यामुळे अंक वैशिष्टय़पूर्ण ठरला आहे.

संपादिका ः अॅड. प्रीती बनारसे-रेवणे, पृष्ठs ः 204, मूल्य ः 300 रुपये

ऋतुरंग

ऋतुरंग दिवाळी अंकाचे हे 33 वे वर्ष आहे. या वर्षीचा अंक ‘मीच हे सांगितले पाहिजे’ या संकल्पनेवर आधारित आहे. सांस्पृतिक, सामाजिक, राजकीय वातावरणात माणूस वावरत असताना व्यक्तिगत आयुष्यात त्याला स्वतःविषयी इतरांविषयी काही सांगावसं वाटतं. हे सांगणं मांडणारा हा विशेषांक. सिनेमा, साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचे दर्जेदार लेख ही परंपरा कायम ठेवत यंदाही या दिवाळी अंकात अशा मान्यवरांचे लेखन वाचायला मिळते. ज्येष्ठ संगीतकार गुलजार यांची अंबरिश मिश्र अनुवादित ‘चंदन’, ज्ञानपीठ विजेते साहित्यिक विनोदपुमार शुक्ल यांची यशोधरा काटकर अनुवादित ‘ओझं’, खुशवंत सिंग यांची राजीव जोशी अनुवादित ‘दंगल’ या कथा ही महत्त्वाची साहित्य निर्मिती वाचनीय आहे. अनुभवांची पटकथा, मला उमजलेला माणूस, विशेष लेख, सांगण्यासारखे हे सर्व विभाग वैशिष्टय़पूर्ण लेखांनी संपन्न आहेत. अभिरुचीसंपन्न असा हा अंक संग्रही ठेवावा असा आहे.

संपादक ः अशोक शेवते, पृष्ठे ः 360, मूल्य ः 300 रुपये

ललित

आशयसंपन्न दर्जेदार लेख हे ललित दिवाळी अंकाचे वैशिष्टय़. वाचन संस्पृती रुजवण्याचा वसा घेतलेल्या ‘ललित’ मासिकाचा यंदाचा दिवाळी अंकही अजोड ठरलेल्या साहित्य निर्मितींची पुनश्च ओळख करून देणारा आहे. बानू मुश्ताक यांच्या बुकर पुरस्कार विजेते ‘हार्ट लॅम्प’ पुस्तक, नोबेल पुरस्कारपाप्त कोरियन लेखिका हांग कांग, अभिजात इंग्रजी साहित्यातील ‘मिसेस डलोवे’ या कादंबरीचा जन्मशताब्दी सोहळा यावर आधारित विशेष लेख वाचायला मिळतील. ज्येष्ठ साहित्यकार अरुणा ढेरे यांची वंदना बोकील-पुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत हे यंदाच्या अंकाचे वैशिष्टय़ आहे. याशिवाय वसंत आबाजी डहाके यांचा ‘दिवस तुडवत अंधाराकडे’, दीपक घारे यांचा ‘पाप सिनेमा’, अनंत देशमुख यांचा ‘कादंबरीकार आणि समीक्षक शांता शेळके’ हे लेख वैशिष्टय़पूर्ण आहेत. सोबत विजय पाडळकर, नीलिमा गुंडी, गणेश मतकरी, प्रवीण बांदेकर, डॉ. नंदू मुलमुले, प्रकाश खांडगे अशा विविध साहित्य प्रवाहांतील लेखकांचे लेखही महत्त्वपूर्ण आहेत. वाचनीय अशा भरघोस मजपुराने ललित दिवाळी अंक परिपूर्ण आहे.

संपादक ः अशोक कोठावळे, पृष्ठे ः 204, मूल्य ः 300 रुपये

 

सुखकर्ता

‘सुखकर्ता’ हा पहिलावहिला दिवाळी अंक. यंदाच्या दिवाळी अंकात हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱया पैलास मानसरोवर यात्रेचे कामगार नेते महेंद्र घरत यांनी मांडलेले अनुभव वाचनीय आहेत. मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त अनंत इंगळे, केसरी टुर्सचे मॅनेजर महेश घाणेकर, उद्योजक शैलेंद्र पाटील, राजेंद्र मोकल, वैभव पाटील यांचेही पैलास मानसरोवर यात्रेबाबतचे अनुभवपर लेख वाचकांना आवडतील. तसेच यात्रेबाबत दिशादर्शक असा हा अंक आहे.

संपादक ः पृष्णा पाटील, पृष्ठे ः 100