
आंध्र प्रदेशातील एलुरूहून हैदराबादला जाणारी खासगी बस उलटल्याने एका प्रवाशाचा मत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एलुरूहून जिल्ह्यातील लिंगापलेम मंडलातील जुबली नगरजवळ सोमवारी रात्री ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 17 प्रवासी होते. अपघातानंतर बस रस्त्यावरून हटवण्याचे काम सुरू आहे. अतिवेगामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज प्राथमिक तपासात वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
            
		





































    
    


















