अमिताभ बच्चन यांनी 12 कोटींना विकले दोन फ्लॅट

अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथील दोन आलिशान फ्लॅटची विक्री केली. हे दोन्ही फ्लॅट ओबेरॉय गार्डन सिटीच्या टॉवरमधील सी, ओबेरॉय एक्झक्विटिव्हच्या 47 व्या मजल्यावर होते. हे दोन्ही फ्लॅट एपूण 12 कोटी रुपयांना विकल्याची माहिती मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाच्या कागदपत्रांतून समोर आली आहे. यातील एक फ्लॅट आशा ईश्वर शुक्ला यांनी, तर दुसरा फ्लॅट ममता सूरजदेव शुक्ला यांनी खरेदी केला आहे. या फ्लॅटचे क्षेत्रफळ 1820 फूट असून यात दोन कार पार्किंगचा समावेश आहे. हे फ्लॅट 29 ऑक्टोबर 2025 ला करण्यात आले. 31 ऑक्टोबर 2025 ला दोन्ही
फ्लॅट्ससाठी 30 लाख रुपयांची स्टॅम्प डय़ुटी आणि 30 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. ओबेरॉय टॉवर हा ओबेरॉय गार्डनचा सिटीचा भाग असून यात ओबेरॉय मॉल, द वेस्टिन हॉटेल, इंटरनॅशनल बिझनेस पार्क आणि ओबेरॉय इंटरनॅशनल स्पूल यांसारख्या सुविधा मिळतात.