
साहित्य संगम
वैचारिक, साहित्यिक व माहितीपूर्ण वाचनीय मजपुराने भरगच्च असा हा दिवाळी अंक. ‘एआय’ या विषयाला धरून अतुल कहाते, महेश कोळी, श्रीनिवास औंधकर, अच्युत गोडबोले यांचे लेख आवर्जून वाचावे असे आहेत. चित्रपट, साहित्य, संस्पृती अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखती वाचनीय आहेत. ‘गोष्टी यशस्वीनींच्या’ या विभागात महिलांच्या यशोगाथा देण्यात आल्या आहेत. गावाची शहरे होताना हा उमाकांत वाघ यांचा लेख सद्यस्थिती मांडणारा आहे. तर अशोक मुळे यांचा डिंपल पब्लिकेशनच्या वाटचालीचा आढावा घेणारा लेख वैशिष्टय़पूर्ण आहे.
संपादक : उमाकांत वाघ
पृष्ठे : 172, मूल्य : 300 रुपये
देवदुर्ग
कोकणच्या भूमीतील या दिवाळी अंकाला खास तिथला गोडवा लाभला आहे. सुभेदारवाडा, कांकणभर या कथा कोकणची पार्श्वभूमी उभी करतात ‘केळीचो कोको’ ही अस्सल मालवणी कथा आपल्या देवगडाच्या भूमीत घेऊन जाते. कापडफाटय़ा आणि कानफाटय़ा ही अविनाश बापट यांची वेगळा बाज असलेली कथा वाचकांना नक्कीच आवडेल.
संपादक : आनंद लोके,
पृष्ठे : 92, मूल्य : 100 रुपये
शब्दगांधार
स्वरमहिमा कला अकादमीचा हा दिवाळी अंक मान्यवरांच्या साहित्याने सजलेला आहे. जालंदर पुरोहित यांचा ‘पाश्चात्त्य संस्पृती पह्फावतेय?’, अलका पुमठेकर यांचा ‘मराठी भाषा अभिजात दर्जा’, चारुशीला बलसरे यांचा ‘माझ्या संगीतमय जीवनाची जडणघडण’, भारती सावंत यांचा ‘संतांनी आपल्याला काय दिले?’ यांसह सर्वच लेखकांचे लेख आणि कविता वाचनीय आहेत. ‘जिवलग मैत्री आठवताना’च्या कथा मैत्रीच्या आठवणी उलगडतात. नीतिमूल्य आणि साहित्य मूल्य जपणारा ‘शब्दगांधार’ हा दिवाळी अंक कौतुकाचा विषय ठरत आहे.
संपादक : डॉ. अरविंद नेरकर, चारुशीला बेलसरे,
पृष्ठे : 152, मूल्य : 300 रुपये


























































