
दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त येथील पोलीस परेड मैदानावर सहस्रदर्शन सोहळा झाला. यावेळी त्यांच्या सिंहायन या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, पेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम करत आहोत. आता एका विशिष्ट टप्प्यावर निवृत्त कधी होणार, असे विचारले जात असले तरी या क्षेत्रातून कधीच निवृत्त होणार नसल्याचे यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले.


























































