मरीन लाइन्सच्या चंदनवाडीत सिलिंडर स्फोटाने भीषण आग, शिवसेना मदतीला धावली

मरीन लाईन्स चंदनवाडी श्रीकांत पालेकर मार्गावरील अन्वर मॅन्शनमध्ये सिलिंडर स्फोटांमुळे दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. ग्राऊंड प्लस तीन मजल्यांच्या बांधकामाला ही आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.

अनवर मेन्शन या ग्राऊंड प्लस तीन मजली इमारतीमध्ये हे सिलिंडर स्फोट झाल्याने मोठी घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी भेट देऊन आढावा घेतला. तसेच रहिवाशांना आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या घटनेची माहिती मिळताच युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ, शाखाप्रमुख मंगेश सावंत, मिलिंद झोरे, स्वप्नील महाडिक, रोहित बामणे, महेश मसानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बचावकार्य करीत असताना शिवसैनिक दीपक देसाई यांना देखील गंभीर दुखापत झाली. या आगीतील बाधितांना तातडीने जवळच्या धर्मशाळेत हवलून करून त्यांची जेवणाची व्यवस्था युवा सेनेकडून करण्यात आली.