
विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करणाऱ्या भाजपचा पर्दाफाश लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही वरळी मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल केली. मतचोरीविरोधात विरोधक आक्रमक होत असतानाच आता खतचोरीही उघडकीस आली आहे. वोटचोरीनंतर भारतीय जनता पक्षाकडून सिल्लोडमध्ये खतचोरी सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
सिल्लोडमध्ये खतजिहाद करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असून बोगस खते शासकिय खतांच्या बॅगांमधून विकले जात असल्याचा गंभीर आरोप दानवे यांना केला आहे. २५० रुपयांचे खत ११५० रुपयांना विकले जात असल्याचा प्रकार समोर आल्याचे दानवे यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे. हा खतजिहाद करणारा भाजपचा कार्यकर्ता कोण? असा सवालही दानवे यांनी केला.
अंबादास दानवे यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. वोटचोरी नंतर सादर आहे भाजपचा ‘खतचोरी’चा एपिसोड, अशा कॅप्शनसह त्यांनी हे व्हिडीओ शेअर करत खतचोरीचा पर्दाफाश केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मतांची घाऊक चोरी पकडली जात असताना आता सिल्लोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांची खतचोरी पहा. डुप्लिकेट खतांची बॅग जिची किंमत २५० रुपयांच्या आसपास आहे, त्यातील बोगस खत शासकिय खतांच्या बॅगांमध्ये भरण्याचा कार्यक्रम सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्ते सर्रास करत आहेत. सरकारी बॅगला बाजारात साधारण ११५० रुपये एवढा भाव आहे. इथे भाजपच्या रूपाने कुंपणच शेत खात आहे! असा हल्लाबोल दानवे यांनी केला.
पावसाच्या अस्मानीने लुटलेल्या गेलेल्या शेतकरी बांधवांना आता भाजपचे लोक अश्या ‘सुलतानी’ (की मुलतानी) पद्धतीने लुटत आहेत. ही खतचोरी करणाऱ्या एका एका माणसाचे नाव मला माहिती आहे. हा खत’जिहाद’ करणारा भाजप कार्यकर्त्या नक्की कोण जो धरलं जात असताना कृषी विभागाच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. शेतकऱ्यांप्रती थोडी जरी आत्मीयता शिल्लक असेल तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने हे नाव सांगावे! असे आवाहन दानवे यांनी केले. मेवाभाऊंची खंबीर साथ.. बोगस धंद्यात घालू हात.. असा टोलाही दानवे यांनी हाणला.
वोटचोरी नंतर सादर आहे भाजपचा ‘खतचोरी’चा एपिसोड..
मतांची घाऊक चोरी पकडली जात असताना आता सिल्लोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांची खतचोरी पहा. डुप्लिकेट खतांची बॅग जिची किंमत २५० रुपयांच्या आसपास आहे, त्यातील बोगस खत शासकीय खतांच्या बॅगांमध्ये भरण्याचा कार्यक्रम सिल्लोडमध्ये भाजप… pic.twitter.com/r6ERvmRmo9
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 6, 2025



























































